बीड : कार-पिकअपच्या अपघातात एक ठार; एक जखमी | पुढारी

बीड : कार-पिकअपच्या अपघातात एक ठार; एक जखमी

केज, पुढारी वृत्तसेवा : केज-अंबाजोगाई रोडवर चंदन सावरगाव जवळील निसर्ग ढाब्याच्या जवळ मारुती ओमीनी इको आणि पिक-
अपच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. महेश अंबादास पेटलपट्टी (27, रा. सोलापूर) असे अपघातात ठार
झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शनिवारी दुपारी 3:30 वा च्या दरम्यान केज अंबाजोगाई रोडवर चंदन सावरगाव जवळील हॉटेल निसर्ग जवळ अंबाजोगाईकडून केजकडे येणारे पिक-अपचे (एम एच-43/ए डी- 7210) टायर फुटल्याने ड ?ायव्हरचा ताबा सुटून समोरून केजकडून अंबाजोगाईकडे जाणार्‍या मारुती ओमिनी इको (एम एच-13/सी के-2614) या गाडीला समोरासमोर धडक दिली. यात ओमीनी इको मधील कपड्याचे व्यापारी महेश अंबादास पेटलपट्टी हे जागीच ठार झाले तर तर व्यंकटेश भुपेंद्र इंगे (47, रा. सोलापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत.

माहिती मिळताच अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय
महाविद्यालय येथे दाखल केले. माहिती मिळताच पोलिस नाईक संपत शेंडगे हे अपघातस्थळी दाखल झाले.

Back to top button