परभणी : ‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करा; नाभिक महामंडळाची मागणी | पुढारी

परभणी : 'त्या' नराधमावर कठोर कारवाई करा; नाभिक महामंडळाची मागणी

मानवत (परभणी); पुढारी वृत्तसेवा : ११ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर पोक्सो व बाललैंगिक प्रतिबंध कायद्याअंतर्गत कडक कारवाई करून फाशी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा व संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन आज (दि. ८) तहसीलदार सारंग चव्हाण यांना देण्यात आले.

ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. हा खटला जलद न्यायालयात चालवून आरोपीला फाशी द्यावी, पीडित कुटुंबालातात्काळ आर्थिक मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष विष्णू वाघमारे, हरिभाऊ पारवे, माणिक हरणे, परमेश्वर झगडे, राधाकिशन राऊत, दत्ता राऊत, बाबू हारणे, वशिष्ठ भाले, बालाजी हारणे, जालिंदर वाघमारे तसेच संभाजी ब्रिगेडचे गोविंद घांडगे, ॲड सुनील जाधव, कृष्णा शिंदे, अमेर अन्सारी, राजेभाऊ होगे, बालाजी टाक, मोहन महिपाल, हनुमान कावे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button