पैठण तालुक्‍यात ४१६ मिमी पाऊस; सर्वाधिक पाचोड मंडळात | पुढारी

पैठण तालुक्‍यात ४१६ मिमी पाऊस; सर्वाधिक पाचोड मंडळात

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील विविध गावातील दहा मंडळांतर्गत काल (सोमवार) सायंकाळी व रात्रीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागात करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ९७ मिमी पाऊस पाचोड परिसरात झाल्याची माहिती नायब तहसीलदार गिरजाशंकर आवळे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

सोमवारी पैठण तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असून, यामध्ये पैठण मंडळात ४४ मिमी, बिडकीन १६, ढोरकीन २१. बालनगर ४५. नांदर ९०. आडूळ २२, लोहगाव १९. विहामांडवा ६२, पाचोड परिसरात ९७ मिलिमीटर पावसाची नोंद महसूल विभागात करण्यात आली.

पिंपळवाडी (पिं) या मंडळातील नोंद प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सोमवारी तालुक्यात एकूण ४१६ मिमी पावसाची नोंद झाली. आजपर्यंत ५६८.८० मिमी पाऊस या तालुक्यात पडला. मंगळवार दि. ६ रोजी सकाळी आठ वाजता येथील नाथसागर धरणाची एकूण पाणी पातळी २८६०.८ दलघमी असून वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक २४ हजार ५२० क्युसेक आहे. तर गोदावरी नदीत २५ हजार ६०४ पाण्याचा विसर्ग होत आहे. यासाठी धरणाचे १८ दरवाजे दीड फूटांनी उघडण्यात आले आहेत.

हेही वाचा :   

Back to top button