पैठण : नाथसागर धरणातून आत्तापर्यंत तब्बल ७३.६७ टीएमसी पाण्याचा विसर्ग | पुढारी

पैठण : नाथसागर धरणातून आत्तापर्यंत तब्बल ७३.६७ टीएमसी पाण्याचा विसर्ग

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये दि.१ जून महिन्यापासून १२५.७० टीएमसी पाण्याची आवक झाली आहेत. तर १ जून पासून धरणातून आत्तापर्यंत ७३.६७ टीएमसी पाण्याचा एकूण विसर्ग करण्यात आल्याची माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दैनिक पुढारी सोबत बोलताना दिले आहे.

सोमवारी (दि.५) रात्री आठ वाजेच्या दरम्यान गोदावरी नदीत २० हजार ३६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग १८ दरवाजे एक फूट उघडे ठेवून सुरू ठेवण्यात आलेला आता आतापर्यंत वरील भागाच्या धरणातून येथील नाथसागर धरणामध्ये दि.१ जून महिन्यापासून १२५.७० टीएमसी पाण्याची आवक झाली होती. याच तारखेपासून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या नियंत्रणाखाली आत्तापर्यंत सांडव्याद्वारे ६७.१२ टीएमसी, जलविद्युत केंद्रातून ३.४६ टीएमसी, उजव्या कालव्यातून २.६२ टीएमसी, डाव्या कालव्यातून ०.४७ टीएमसी असा एकूण ७३.६७ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे.

दरम्यान अद्याप अर्थात सोमवारी रात्री आठ पर्यंत येथील धरणात २३ हजार ८२३ क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू होती. तर गोदावरी नदीत २० हजार ३६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग १८ दरवाजे एक फूट उघडे ठेवून सुरू ठेवण्यात आला आहे. सध्या धरणामध्ये एकूण पाणीसाठा १००.७८ टीएमसी नोंद नियंत्रण कक्षात करण्यात आली. धरणातील पाण्याची टक्केवारी ९७.४७ असल्यामुळे व सध्या धरणाच्या वरील भागासह पैठण तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार पाऊस होत असल्याने उद्या, मंगळवार पर्यंत पाण्याची आवक लक्षात घेत धरणातून काही प्रमाणावर विसर्ग वाढविण्याची शक्यता धरण नियंत्रण कक्षातून व्यक्त करण्यात आली आहे.

Back to top button