हिंगोली : बँकेत गहाण ठेवलेली जमिनीची परस्पर विक्री; तिघांवर गुन्हा | पुढारी

हिंगोली : बँकेत गहाण ठेवलेली जमिनीची परस्पर विक्री; तिघांवर गुन्हा

वसमत (हिंगोली); पुढारी वृत्तसेवा : नांदेड मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वसमत शाखेमध्ये 25 लाख रुपयाचा कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवलेली जमीन कर्जदारांनी परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तिघांवर वसमत शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अशिषकुमार भराडिया (वय 33, रा.वजिराबाद, नांदेड) यांनी शुक्रवारी (दि. 2) शहर पोलिसात तक्रार दिली. फिर्यादी नुसार, नामदेव गणपतराव जमधाडे (रा.रायवाडी, ता.वसमत), रमेश बळीराम फुलझळके (रा.वसमत), राधेश्याम पांडुरंग सोळंके (रा.लिंगी, ता.वसमत) यांनी संगनमत करुन नांदेड मर्चंट बँकेकडे तारण म्हणून गहाण ठेवलेली स्थावर मालमत्ता परस्पर विक्री करुन शासनाची व फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.ए. बोराटे करीत आहेत.

Back to top button