औरंगाबाद : नाथसागर धरणातून ३७ हजार ७२८ क्युसेक पाण्याचा ‘गोदावरी’त विसर्ग | पुढारी

औरंगाबाद : नाथसागर धरणातून ३७ हजार ७२८ क्युसेक पाण्याचा ‘गोदावरी’त विसर्ग

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक येथील धरणात जमा होत आहे. गुरुवारी (दि. 1) रात्री आठ वाजेच्या दरम्यान पाटबंधारे विभागाच्या धरण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील नाथसागर धरणाचे अठरा दरवाजे दोन फूट उंचीने उघडले. त्यामुळे गोदावरी नदीमध्ये ३७ हजार ७२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

दरम्यान, शुक्रवारी (दि. 2) सकाळी नाशिक गंगापूर परिसरातील धरणातून विसर्ग करण्यात आलेल्या पाण्याची आवक या धरणात येऊन मिळाल्यास परिस्थिती लक्षात घेऊन पैठण तालुक्यातील गोदावरी नदीत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे.

गुरुवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान येथील नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढ झपाट्या वाढली. त्यामुळे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी येथील नाथसागर धरणातील पाण्याची ९८.६२ टक्केवारी कायम ठेवून येणाऱ्या आवक प्रमाणे १८ दरवाजातून गोदावरी नदीत विसर्ग सोडण्यात सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नाशिक गंगापूर परिसरातील सोडण्यात आलेले पाण्याची आवक या धरणात येऊन मिळाल्यास परिस्थिती लक्षात घेऊन गोदावरी नदीत सोडलेल्या पाण्याचा विसर्ग काही प्रमाणावर वाढविण्यात येईल. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा २८७९ .१८९ दलघमी असून येणाऱ्या पाण्याची आवक त्याच पद्धतीने विसर्ग करण्यात येत आहे.

Back to top button