बीड : एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

बीड : एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

धारूर (जि. बीड), पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील देवदहिफळ येथील रहिवासी आणि लातूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या भागवत सुनील बडे (21) या विद्यार्थ्याने लातूर येथे हॉस्टेलच्या खोलीत मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या
दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

भागवत बडे हा लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी गावाकडे गेलेला भागवत मंगळवारी (दि. 30) लातुरात परत आला. संध्याकाळी सहाच्या दरम्यान त्याने हॉस्टेलच्या रूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी लातूर येथे धाव घेतली. भागवतचे वडील सुनील बडे हे शेतकरी आहेत. अत्यंत हुशार व स्वभावाने  मनमोकळा असलेल्या भागवतने टोकाचे पाऊल का उचलले असावे, हे गूढ कायम आहे. भागवत याचे शालेय शिक्षण दिंद्रूड येथे झाले असून, शासकीय कोट्यातून त्याची एमबीबीएस च्या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली होती. बुधवारी सकाळी त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Back to top button