औरंगाबाद : अंबाडी प्रकल्पाजवळील खदाणीत ४० वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : अंबाडी प्रकल्पाजवळील खदाणीत ४० वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू

कन्नड; प्रतिनिधी : कन्नड येथील अंबाडी प्रकल्पाजवळ असलेल्या खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या चाळीस वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नईम शेख हसन असे मृत व्यक्तीचे नाव आहे. १५ ऑगस्ट रोजी नईम शेख हसन (मूळगाव भराडी, सध्या रा. करीम नगर, कन्नड) हा चाळीस वर्षीय इसम अंबाडी प्रकल्पाच्या जवळ आसलेल्या दगडाच्या खदाणीत अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात पहिली डुबकी मारून तो वर आला. परत दुसरी डुबकी मारली त्यानंतर मात्र तो वर आलाच नाही. बराच वेळ झाला तरी वरती न आल्याने तेथील लोकांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच बीट जमादार जयंत सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात पोहून शोध घेणाऱ्या खासगी लोकांची मदत घेतली. मात्र त्या इसमाचा देह आढळून आला नाही. १६ ऑगस्ट रोजी सकाळी अग्निशमक दलाची तुकडी घटनास्थळी हजर झाली व पुन्हा शोधकार्य सुरू झाले. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नईम शेख हसन यांचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमक दलाला यश आले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शेख नईम यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा

Back to top button