गेवराई : विद्युत तारेला स्‍पर्श झाल्‍याने शेतकऱ्याचा मृत्‍यू | पुढारी

गेवराई : विद्युत तारेला स्‍पर्श झाल्‍याने शेतकऱ्याचा मृत्‍यू

गेवराई ; पुढारी वृत्तसेवा : रानडुकरापासून संरक्षण मिळावे यासाठी उसाला तार कुंपण लावून त्यात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या तारेला स्‍पर्श झाल्‍याने विजेचा धक्‍का लागून एका शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे घडली. यात एका शेळीचाही विजेचा धक्‍का लागूण मृत्यू झाला.

नंदू उद्धव थोपटे (वय ४०, रा. अर्धमसला, ता.गेवराई) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते मंगळवारी आपल्या शेतात काम करून सायंकाळच्या सुमारास घरी निघाले होते. यावेळी त्‍यांच्या सोबत असलेली शेळी उसात गेली असता, तीला पाहण्यासाठी ते ऊसाच्या फडात गेले. त्याचवेळी रानडुकरापासून संरक्षण मिळावे यासाठी लावलेल्या तारेत सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला.

यात शेळीचाही विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. मंगळवारी रात्री त्‍यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे अर्धमसला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button