लातूर : चाकूरच्या नवदाम्पत्याचा कोटा येथे अपघात ; पत्नी ठार

लातूर : चाकूरच्या नवदाम्पत्याचा कोटा येथे अपघात ; पत्नी ठार

चाकूर; पुढारी वृत्तसेवा: येथील रहिवासी अभिषेक माकणे व पत्नी मनिषा माकणे या नवदाम्पत्याचा राजस्थानातील कोटा-बोरा महामार्गावर (क्रमांक २७)  भीषण अपघात झाला. यात पत्नी मनिषा माकणे यांचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पती अभिषेक माकणे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना रविवारी (दि.१७) घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अभिषेक माकणे (वय २९) आणि मनिषा माकणे (वय २६) यांचा एक महिन्यापूर्वी विवाह झाला आहे. अभिषेक हा कोटा येथे एका खाजगी कंपनीत अभियंता होता. तो ८ दिवसापूर्वीच आपल्या पत्नीस घेऊन कोटा येथे राहण्यास गेला होता. रविवारी कंपनीला सुट्टी असल्याने माकणे सपत्नीक कोटा बारा हायवेवरुन कोटा येथे मोटारसायकल वरुन येत होते. यावेळी मागून येणाऱ्या कारने सिमल्या गावाजवळील कस्बे टोल नाक्यापासून काही अंतरावर त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. १० फुट उंचीवरून मोटार सायकल एका शेतात जाऊन पडली.

त्यामुळे अभिषेक माकणे यांच्या पत्नी मनिषा या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी कोटा येथील एका रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. तर पती अभिषेक माकणे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर कोटा येथील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news