औरंगाबाद : पैशांचा पाऊस पाडतो म्हणत 11 लाखांना गंडा | पुढारी

औरंगाबाद : पैशांचा पाऊस पाडतो म्हणत 11 लाखांना गंडा

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : ‘जेवढे आम्हाला पैसे देणार त्यापेक्षा दुप्पट पैशांचा पाऊस पाडून देतो’, अशी बतावणी करून भोंदूबाबासह त्याच्या साथीदारांनी गोव्याच्या वृद्ध महिलेसह दोघांना साडेअकरा लाखांना गंडा घातला. दोन ठिकाणी पूजा मांडून त्यांच्यासमोर अंधारात बॅटरीच्या उजेडामध्ये नोटा उधळल्या. फिर्यादींना फसवणुकीचा संशय आल्यावर त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानंतर गुन्हे शाखेने भोंदूबाबासह त्याच्या दोन्ही साथीदारांना शुक्रवारी (दि. 15) पहाटे बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून 60 हजारांच्या रोख रकमेसह 1 दुचाकी, 2 मोबाइल असा सुमारे 1 लाख 22 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

कैलास रामदास सोळुंके (25, रा. एकतानगर, लांजी रोड) असे भोंदू बाबाचे तर गोरख साहेबराव पवार (22, रा. नवीन बजार तळ कालिकानगर, शिर्डी ) आणि प्रमोद दीपक कांबळे (31, बौद्धनगर, जवाहर कॉलनी) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले, जावेद खान नुर खान (50, रा. प्रिया कॉलनी पडेगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादीचा पडेगाव परिसरात प्रिया नावाचा धाबा होता. मात्र 2006 साली फिर्यादीने ढाबा बंद करुन ते प्लॉटिंग खरेदी-विक्रीचा व्यवसाय करू लागले. तत्पूर्वी फिर्यादी ढाबा चालवत असताना त्यांची पुष्पा ऊर्फ रत्नदीप बाळगो गाडेकर (70, रा. कानकाबन, मापासा, गोवा) या महिलेशी ओळख झाली होती. फिर्यादीने त्यांना बहीण मानलेले होते. पुष्पा गाडेकर आधूनमधून त्यांना भेटण्यासाठी घरी येत असत. 15 जून रोजी पुष्पा गाडेकर आणि महेश ऊर्फ शोधन प्रसाद निपाणीकर (रा. साईनगर, मापसा गोवा) दोघे फिर्यादीच्या घरी आले होते. त्यावेळी फिर्यादीने त्यांची ओळख आरोपी प्रमोद कांबळे याच्याशी करुन दिली. कांबळेने एक मांत्रिक पैशांचा पाऊस पाडून दिलेल्या रकमेच्या दुप्पट पैसे करून देतो, असे सांगितले. त्यावर तिघांनी विश्वास ठेवला. कांबळेने मांत्रिकाची भेट घालून देण्यासाठी पाच हजार रुपये घेतले. 16 जून रोजी कांबळेने आरोपी मांत्रिक कैलास साळुंकेची तिघांशी भेट घालून दिली.

1 लाख 22 हजारांचा ऐवज हस्तगत : सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुम यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. गुन् हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी सापळा रचून भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. तर एक साथीदार रवींद्र हुंडे (50, लालमाती, भावसिंगपुरा) हा पसार झाला. दरम्यान, आरोपी साळुंकेच्या ताब्यातून 60 हजारांची रोख रक्कम, दुचाकी (एमएच 20, डीआर 3290), मोबाइल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी कांबळे आणि गोरख पवार यांच्याकडून प्रत्येकी 1 मोबाइल असा सुमारे 1 लाख 22 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

आरोपींना 18 जुलैपर्यंत कोठडी : आरोपींना शुक्रवारी न् यायालयात हजर केले असता वकील दत्तात्रय काठुळे यांनी आरोपींनी किती लोकांची फसवणूक केली, गुन् ह्यातील उर्वरित रक्कम हस् तगत करणे, साथीदारांना अटक करण्याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण् याची विनंती न् यायालयाकडे केली. प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एम.आर. देशपांडे यांनी 18 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंधारात दाखवल्या पैशांच्या गोण्या

आरोपीने तिघांना वाळूजच् या पुढे लांजी रोडने शेकटा (ता. पैठण) येथे एका नातेवाईकाच् या घरी नेले. तेथे पूजा मांडून अंधारात बॅटरीच्या उजेडात पैशांच् या गोण् या दाखवल्या. त् यामुळे त्यांचा विश् वास बसला. 30 जून रोजी आरोपीने तिघांना शिर्डी येथील बहिणीच् या घरी नेले. आरोपीचा मेहुणा गोरख पवार याने त् याच् या घराच्या शेजारी पूजा मांडली. तेथेही अंधारात बॅटरीच्या उजेडात पैशांचा पाऊस दाखवला.

…अन् शंका आली

मी सर्व विधीवत पूजा करून तुम्हाला काही दिवसांत मोठा पैशांचा पाऊस पाडून दाखवतो. तसेच तुम्ही दिलेली रक्कम दुप् पट करून देतो, असे सांगत कार्तिक हॉटेलवर बोलावून पूजेच् या साहित् यासाठी 90 हजार रुपयांची मागणी केली. त् यावेळी फसवणूक होत असल्याचे फिर्यादींसह पुष्पा गाडेकर आणि शोधन निपाणीकर यांच् या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ सहायक पोलिस आयुक्त ढुमे यांच्याकडे तक्रार केली. 11 लाख 62 हजारांची केली फसवणूक साळुंके याने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा आणि बोकड लागेल, असे सांगून 7 हजार रुपये घेतले. 17 जून रोजी आरोपीने फिर्यादीसह तिघांना वाळूज येथे बोलावून पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगत पूजेचे सामान, सोन्याच्या मुंजेसाठी फिर्यादीकडून 2 लाख रुपये, पुष्पा गाडेकर यांच्याकडून 5 लाख 90 हजार व शोधन निपाणीकर यांच् याकडून 3 लाख 60 हजार असे सुमारे 11 लाख 62 हजार रुपये घेतले.

Back to top button