यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांचा उमरखेड दौरा; प्रशासनाला फिल्डवर राहण्याचे आदेश

उमरखेड, पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उमरखेड तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना फिल्डवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील आठ दिवसांपासून उमरखेड तालुक्यातील परिसरात मुसळधार पाऊस पडत असून पेनगंगा नदी दुधडी भरून वाहत आहे. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गावात पुराच्या साचलेल्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या सर्व पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी उमरखेड तालुक्याचा दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला.
तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना फिल्डवर राहण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आल्या. यावेळी कृषी, विभाग वन विभाग, पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या धोकादायक पुलांना भेटी
सततच्या पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. मार्लेगावजवळील राष्ट्रीय महामार्गावरील उमरखेड- हदगाव पुलापर्यंत पाणी आले असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे. जिल्हाधिकारी यांनी धोकादायक उमरखेड -हदगाव पुलाल भेट दिली. तिथेच नवीन होणाऱ्या पुलाचे कॉन्ट्रॅक्टर सदभाव कॅन्स्ट्रकशनला लवकरात- लवकर पुलाचे काम करण्याच्या सूचना केल्या.
मागील वर्षी एसटी गेली होती वाहून
मागील वर्षाच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दहागांव येथील नाल्यावरील जुना पुल तोडून यावर्षी नवीन पुलावरून वाहतूक सुरु आहे. मागील वर्षी दहागांवच्या याच पुलावरून एसटी पाण्यात वाहून पाच लोकांचा बळी गेला होता. यानिमित्ताने मागील घटनेच्या आठवणी ताजी झाली.
हेही वाचलंत का?
- औंध, बाणेर, पाषाणमधील रस्त्यांवर पाणीच पाणी
- नगर : 16 गावांत जनतेतून सरपंच निवड; कहीं खुशी कहीं गम!
- लॉकडाउननंतर यंदा मुडदूसचे रुग्ण वाढले