परभणी : गंगाखेड येथील रुग्णवाहिका चालकाचा अपघातात मृत्यू

परभणी : गंगाखेड येथील रुग्णवाहिका चालकाचा अपघातात मृत्यू

गंगाखेड ; पुढारी वृत्तसेवा : येथील एका खासगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१२) रात्री दगडवाडी परळी शिवारात घडली. गजानन चिलगर (रा. परळी नाका, गंगाखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गजानन चिलगर हा एका खासगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत आहे. तो मंगळवारी रात्री उशिरा परळी येथे रुग्णांना रुग्णवाहिकेतून सोडण्यासाठी गेला होता. तेथून परतताना त्याचा दगडवाडी परळी शिवारात रुग्णवाहिकेवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अपघाती मृत्यूवर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
अत्यंत गरीब कुटुंबातील गजानन चिलगर हा कोरोना काळात अनेकांच्या मदतीला धावून आला होता. त्याचा मंगळवारी वाढदिवस होता. त्याच दिवशी त्याचे अपघाती निधन झाल्याने शोक व्यक्त केला जात होता. आज (दि.१३) दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news