औरंगाबाद : विद्यार्थी बनून करायचा वाहनचोर्‍या | पुढारी

औरंगाबाद : विद्यार्थी बनून करायचा वाहनचोर्‍या

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : विद्यालयात गणवेश व पाटीवर सॅक अडकवून, तो विद्यार्थ्यांसारखाच वावरायचा आणि संधी मिळताच पार्किंग मधील दुचाकीसह ब्रँडेड सायकली चोरायचा. हा चोरटा नुकताच संशयावरून सिटीचौक पोलिसांच्या हाती लागला. त्याने तब्बल दोन दुचाकी व 12 ब्रँडेड सायकली चोरल्याचे तपासात पुढे आले. अर्जुन बेलाआप्पा वाणी (40, रा. सातपूर, शिवाजीनगर, नाशिक) असे चोरट्याचे नाव आहे.

अर्जुन वाणी हा केवळ मौजमजा करण्यासाठी चोरी करत असल्याचे पुढे आले असून, आपली चोरी लपवण्यासाठी तो विद्यार्थ्यांचा लूक वापरूनच महाविद्यालयात फेरफटका मारायचा. दरम्यान, तो 27 जून रोजी रात्री दहाच्या सुमारास आमखास मैदानाजवळ एका दुचाकीवर संशयितरीत् या उभा होता. त्याला सिटीचौक पालिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे व त्यांचे सहकारी मुनीर पठाण, विलास काळे, बबन इप्पर यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन दोन दुचाकी व 12 ब्रँडेड सायकलीसह सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Back to top button