हिंगोली: जादा दराने खत विक्री केल्यास कारवाई | पुढारी

हिंगोली: जादा दराने खत विक्री केल्यास कारवाई

वसमत:ः तालुक्यातील खत दुकानदार जादा भावाने खताची विक्री होत असल्याचे सतत तक्रारीत वाढ आसल्याने उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी पं.स. चे तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन विशेष तपासणी पथक तयार केले. जादा भावाने खत विक्री करणार्‍या दुकानदारावर कारवाई करावी, असे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिले.

मान्सूनचे आगमन नेमकीच सुरू झाले असून शेतकरी आता खरीप हंगामाच्या पेरण्यासाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी? या विवंचनेत अडकले आहेत. ऐनवेळी धावपळ नको म्हणून पीक कर्जासाठी काही शेतकरी आतापासूनच बँकांचे उंबरठे झिजवत फिरत आहेत. ज्यांना बँका दारात उभ्या करत नाहीत, अशांनी उसनवारी, पदरमोड, व्याजाने पैशांची सोय करून बी-बियाणे आणि खतासाठी जिवाचा आटापिटा सुरू केला आहे.

जिवाचे एवढे रान करूनही मागच्या वर्षीचा अनुभव पाहता शेतकर्‍यांना खत, बियाणे व्यवस्थित मिळतील, याची कसलीही शाश्वती नाही. त्यामुळे खते आणि बियाणे जादा भावाने विक्री होत असून शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी उपविभागीय कार्यालयात कृषी अधिकार्‍यांची बैठक बोलावली. तालुक्यातील कृषी केंद्रांची तपासणी करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली. सदर बैठकीस वसमतचे तहसीलदार अरविंद बोळगे, तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड, कृषी अधिकारी डॉ. आर. सी. राऊत आदींची उपस्थिती होती

Back to top button