औरंगाबाद : वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : शेतामध्ये ठिंबक सिंचन करण्यासाठी पाईप टाकत असताना वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.११) दुपारी तालुक्यातील सावखेडाजवळील उटाडेवाडी शिवारात घडली. संजय नथ्थू उटाडे (वय ४०) असे मृत्‍यू झालेल्‍या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे सावखेडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शेतामध्ये कपाशीच्या लागवडीसाठी संजय उटाडे ठिंबक सिंचन करण्यासाठी पाईप टाकत होते. या दरम्यान अचानक वीज पडली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेत मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणला. दरम्यान, तालुक्यात शुक्रवारपासून ढगाळ वातावरण आहे. शनिवारी दुपारी तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button