गोपीनाथ मुंडे स्मृतीदिन : धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक | पुढारी

गोपीनाथ मुंडे स्मृतीदिन : धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व अमरसिंह पंडित यांनी आज शुक्रवारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी गोपीनाथ गडावर येऊन दर्शन घेतले.

दिवंगत भाजप नेते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त सकाळपासूनच गोपीनाथ गडावर अनेकांनी गर्दी केली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर गोपीनाथ गडावर येऊन स्मृतिदिनानिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन करत आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईहून हेलिकॉप्टरने येऊन गोपीनाथ गडावर दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत अमरसिंह पंडित व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button