जालना : परतूर तहसीलदारच्या शासकीय निवासस्थानावर अज्ञाताकडून दगडफेक | पुढारी

जालना : परतूर तहसीलदारच्या शासकीय निवासस्थानावर अज्ञाताकडून दगडफेक

परतूर, पुढारी वृत्तसेवा : येथील तहसीलदार रूपा चित्रक यांच्या शासकीय निवासस्थानावर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक झाल्याची घटना मंगळवारी (दि ३१) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. तहसीलदार रूपा चित्रक या आपल्या शासकीय निवासस्थानी असताना अज्ञात दोन ते तीन जणांनी त्यांच्या निवासस्थानावर दगडफेक केली.

दरम्यान दगडफेक होताच तहसीलदार यांनी पोलिसांना संपर्क साधला.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दगडफेक करणारे इसम फरार झाले होते. पोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना रात्री शोध लागला नाही. मात्र घटना घडली असताना तहसीलदार यांनी पोलिसात तक्रार केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांना विचारले असता ते म्हणाले, रात्री अज्ञात दारुड्या दोन तीन लोकांनी तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानावर दगड फेक केली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. मात्र अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून प्रसार झाले. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. पण, पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button