Gold is expensive : इमिटेशन ज्वेलरीच्या विक्रीत ६० टक्के वाढ | पुढारी

Gold is expensive : इमिटेशन ज्वेलरीच्या विक्रीत ६० टक्के वाढ

गेवराई : गजानन चौकटे : सोन्याच्या भावात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे (Gold is expensive)  महिलांची सोन्याचे दागिने घालण्याची हौस इमिटेशन ज्वेलरी खरेदी करून पूर्ण करावी लागत आहे. गेल्या २ ते ३ वर्षात इमिटेशन ज्वेलरीच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. त्यासोबत आर्टिफिशियल ज्वेलरी, ऑटक इमिटेशन ज्वेलरी, टेपल ज्वेलरीची मागणी वाढली आहे. परिणामी गेवराई तालुक्यात इमिटेशन ज्वेलरी विक्री ६० टक्के वाढली असल्याचे गेवराई येथील प्रसिद्ध व्यापारी विजय वाघमारे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

गेल्या काही वर्षात सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर (Gold is expensive) गेले आहेत. तरी देखील महिला वर्गामध्ये सोन्याच्या दागिन्यांचे आकर्षक कमी होत नाही. आता गोरगरीबांसाठी पर्याय म्हणून बाजारपेठेत इमिटेशन ज्वलेरी, आर्टिफिशियल ज्वलेरी, टेम्पल ज्वेलरी यासह अर्धा ग्रॅमपासून दोन ग्रॅमपर्यत सोन्याचे मंगळसूत्र उपलब्ध झाले आहे. याशिवाय अगदी ५० रूपयांपासून मिळणाऱ्या विविध आकर्षक, रेखीव व देखीव असणाऱ्या बारीक नक्षीकाम केलेले बांगड्या , बनावट अमेरिकन डायमंड असलेले मंगळसूत्र आदी अनेक आकर्षक आर्टिफिशियल दागिन्यांची विक्री होऊ लागली आहे, असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग आणि युक्रेन युध्दानंतर सोन्याचे मोल अवघ्या जगाला समजले. यामुळे सोन्याच्या खरेदी मध्ये वाढ होत आहे. परिणामी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. भारतात लग्न समारंभात सोन्याचे दागिने देण्याची पूर्वापार परंपरा चालत आली आहे. परंतु वाढती महागाईमुळे आता त्याची जागा आर्टिफिशियल ज्वेलरीने घेतली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कमी रकमेत अधिक दागिने मिळतात. तसेच चोरीची भीती देखील कमी असते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षात आर्टिफिशियल, ज्वेलरी तसेच मंगळसूत्रामध्ये साधारणपणे ६० टक्के वाढ झाली आहे. भविष्यात सोन्याच्या दागिन्यापेक्षा कमी वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि आर्टिफिशियल दागिने यामध्ये दिवसेंदिवस वाढ होणार आहे.
– विजय वाघमारे, व्यापारी, गेवराई

हेही वाचलंत का ? 

Back to top button