हिंगोली : दुचाकी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू | पुढारी

हिंगोली : दुचाकी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ ते जवळा बाजार मार्गावर नागेशवाडी शिवारात दुचाकी रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.20) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. ज्ञानेश्वर मारुती कोकाटे, विश्वनाथ परसराम माघाडे अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथील ज्ञानेश्वर कोकाटे व विश्वनाथ माघाडे हे दोघे जण त्यांच्या दुचाकी वाहनावर बाराशिव शिवारामधील शेतात गेले होते. रात्री आठच्या सुमारास दोघेजण नागेशवाडी गावाकडे येत होते. यावेळी नागेशवाडी शिवारामध्ये रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर त्यांची दुचाकी धडकली. या अपघातामध्ये दोघेही जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत रूग्‍णांना तातडीने औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्‍यान दोघांचाही मृत्यू झाला. मात्र याप्रकरणी पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद झाली नाही.

Back to top button