हिंगोली : अल्पवयीन मुलाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग | पुढारी

हिंगोली : अल्पवयीन मुलाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सेनगाव ; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्ह्यातील भंडारी गावात किराणा दुकानाहून सामान घेवून शेतातील आखाड्याकडे निघालेल्या दहा वर्षीय बालिकेचा सोळा वर्षीय मुलाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. २५ एप्रिल रोजी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील भंडारी येथील मुलीचे कुटुंबीय शेतातील कामानिमित्त आखाड्यावर होते. आपल्या दहा वर्षीय मुलीला त्यांनी गावातील दुकानाहून किराणा सामान आणण्यास सांगितले. दुकानाहून सामान घेवून परत आखाड्याकडे येत असताना रस्त्यातील ओढ्याजवळ जावेद हबिब पठाण (१६, रा.भंडारी) याने वाईट हेतूने मुलीचा हात पकडून तिचा विनयंभग केला.

त्यानंतर कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. पिडीत मुलगी आखाड्यावर आल्यानंतर घडला प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी जावेद हबिब पठाण याच्या विरूद्ध कलम ३५४ (अ), ५०६ भादंवी सहकलम ८,१०, १२ बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि लोकडे करीत आहेत.

Back to top button