अजिंठा : पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध अजिंठा घाट वर चढून आलेली मुक्ताईनगर – औरंगाबाद एसटी बसने अचानक पेट घेतली. ही घटना आज (रविवार) दुपारी साडे चारच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखत बसमधील ५६ प्रवाशी खाली उतरविण्यात आले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. पोलीस व ग्रामस्थांनी टँकरच्या साह्याने आग आटोक्यात आणली.
याबाबत अधिक माहिती अशी, मुक्ताईनगर आगाराची (एमएच १४ बीटी १६५२) मुक्ताईनगर -औरंगाबाद ही बस अजिंठा घाट चढून वर आली. यावेळी पोलीस वायरलेस वळणाजवळ चालकाच्या कॅबिनमध्ये अचानक पेट घेतला. सुदैवाने प्रवाशी तत्काळ खाली उतरल्याने सुखरूप बचावले.
घटनेची माहिती मिळताच साह्ययक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, बीट जमादार अक्रम पठाण, संजय ब्राम्हणदे यांच्यासह ग्रामस्थांनी पाण्याच्या टँकरने आग आकोट्यात आणली. बॅटरी बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचलंत का ?