बीड : सिमेंट बंधार्‍याजवळ आढळले नवजात मयत अर्भक | पुढारी

बीड : सिमेंट बंधार्‍याजवळ आढळले नवजात मयत अर्भक

बीड, पुढारी वृत्तसेवा : सिमेंट बंधार्‍याच्या कडेला एक नवजात मुल मयत झाल्‍याचे सोमवारी आढळले. सदर नवजात मुल एका पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले होते. ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्‍ळी धाव घेतली. त्‍यानंतर त्‍याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बीड तालुक्यातील कपिलधारवाडी परिसरामध्ये एका सिमेंट बंधार्‍या कडेला पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले एक नवजात मुल मयत झाल्‍याचे गुराख्याला दिसले. त्याने तात्‍काळ याची माहिती पोलीसांना दिली. माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी पांढर्‍या कपड्यामध्ये गुंडाळलेले मयत नवजात अर्भक दिसून आले. त्यावर कुठेही जखम झालेली नव्हती. हे अर्भक एक दिवसाचे असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. सदरील अर्भक हे जिल्हा रुग्णालयात दाखल केले आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Back to top button