माजलगाव तालुक्यात ३२ लाखाचा गुटखा पकडला | पुढारी

माजलगाव तालुक्यात ३२ लाखाचा गुटखा पकडला

गौतम बचुटे/केज : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने धाडसी कार्यवाही करून माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील गुटख्याच्या गोडाऊनवर धाड टाकून ३२ लाख ४८ हजार रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला आहे.

माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे एका शेतातील गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळताच (दि. ३० मार्च) बुधवार रोजी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे आणि संजय घुले यांच्या पथकाने पात्रुड येथे मोमीन बाबु अब्दुल मजिद याच्या घरी व शेतातील गोडाऊन धाड टाकली. या धाडीत गोवा, राजनिवास, हिरा असा महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला व आरोग्यास अपायकारक असलेला ३२ लाख ४८ हजार रु. किंमतीचा गुटखा जप्त केला.

या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात मोमीन बाबु अब्दुल मजिद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button