बीड : साळेगाव येथे कार-दूचाकीचा अपघात, दोघे जखमी | पुढारी

बीड : साळेगाव येथे कार-दूचाकीचा अपघात, दोघे जखमी

केज (जि. बीड) : पुढारी वृत्तसेवा

दारू पिऊन मोटार सायकल चालवून एका चालत्या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील दोघे जखमी झाले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, शुक्रवार (दि. १८) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान केज-कळंब रोडवर साळेगाव येथील शंकर विद्यालयाजवळ अपघात घडला. केजकडून येत असलेल्या चारचाकी गाडीला (एमएच-०४/एफ एफ-४९५५) दूचाकीची (एम एच-२५/९५४९) धडक बसली. दूचाकीस्वार युनूस बागवान (रा. कळंब, जि. उस्मानाबाद) व चंद्रकांत दहातोंडे (रा. माळेगाव, ता. केज) यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. हे दोघीही यात जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात प्रथमोपचारासाठी हलवण्यात आले.

या अपघाताची माहिती परमेश्वर लांडगे आणि फेरोज सय्यद यांनी गौतम बचुटे यांना दिली. त्यानंतर त्यांनी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना याबाबत कळवले. या वृत्ताची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इनामदार, अशोक नामदास, अशोक गवळी यांनी घटनास्थळी हजेरी लावली. आणि घटनेबाबत माहिती घेतली.

Back to top button