लातुरमध्ये गळा चिरून पतीने केला पत्नीचा खून

 निर्घृण हत्या www.pudhari.news
निर्घृण हत्या www.pudhari.news

लातूर ; पुढारी वृत्तसेवा : माहेरी असलेल्या स्वतःच्या पत्नीचा तिच्या पतीने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. शहरातील अवंती नगरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. अब्दुल असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

अब्दुल हा त्याच्या पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत होता त्यामुळे ती तिच्या माहेरी आई-वडीलाडे स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलासह राहत होती. बुधवारी अब्दुल त्याच्या पत्नीकडे आला घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने त्याच्या पत्नीचा गळा चिरून खून केला. ही घटना कळताच त्या भागात गर्दी झाली होती.

दरम्यान अब्दुल हा त्याच्या पत्नीचा छळ करत होता याबाबत तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आपण गेलो होतो परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. कोणत्या कारणासाठी पतीने पत्नीचा खून केला हे समजू शकले नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीस अटक केल्याशिवाय मुलीचे प्रेत हलवणार नाही अशी भूमिका मुलीच्या वडिलांनी घेतल्याने तेथे तणाव निर्माण झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news