Pankaja Munde : मुंडे भगिनींच्या प्रयत्नांना यश; बीड जिल्हयात होणार आणखी चार राष्ट्रीय महामार्ग | पुढारी

Pankaja Munde : मुंडे भगिनींच्या प्रयत्नांना यश; बीड जिल्हयात होणार आणखी चार राष्ट्रीय महामार्ग

बीड ; प्रतिनिधी : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने बीड जिल्हयात चार राष्ट्रीय महामार्गासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. परळी -सिरसाळासह चार रस्त्यांसाठी ७६८ कोटीची ही निविदा आहे. लवकरच महामार्गाच्या या कामांना सुरवात होणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. दोन्ही मुंडे भगिनींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. (Pankaja Munde)

नॅशनल हायवेने गुरूवारी (दि.२०) या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. यात परळी ते सिरसाळा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट असून तो तसाच पुढे बीड पर्यंत असणार आहे. पहिल्या टप्प्यात यासाठी २३५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. हा रस्ता चौपदरी होणार आहे.

या रस्त्यासह जिल्हयातील ज्या चार महामार्गाची निविदा प्रसिद्ध झाली आहे, त्यात साबलखेड- आष्टी – चिंचपूर- जामखेड २१२ कोटी ७० लाख, जामखेड ते सौताडा १३६ कोटी, शिरापूर/नवगन राजुरी जंक्शन ते शिवाजी चौक बीड आणि बार्शी नाका ते जरूड फाटा १८४ कोटी ७६ लाख अशी एकूण ७६८ कोटी ४६ लाखाची ही कामे आहेत.

Pankaja Munde : गडकरींचे मानले आभार

जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वासाठी पंकजा मुंडे व खा.डॉ.प्रितम मुंडे ह्या सुरवातीपासून प्रयत्नशील होत्या. वेळोवेळी त्यांनी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तसेच पत्र देऊन पाठपुरावा केला होता.

या प्रयत्न आणि पाठपुरव्याला यश आले आहे. निविदा निघाल्या असून या कामांमुळे जिल्हयाच्या विकासात मोठी भर पडणार असल्याचे पंकजा व खा. प्रितम मुंडे ययांनी गडकरींचे आभार मानले आहेत.

Back to top button