लातूर : वलांडीजवळ दुचाकी धडकून दोन युवक ठार; एक जण जखमी | पुढारी

लातूर : वलांडीजवळ दुचाकी धडकून दोन युवक ठार; एक जण जखमी

लातूर, पुढारी वृत्तसेवा : वलांडी-भालकी राज्य मार्गावर मंगळवारी रात्री साडेआठ वाजता बोंबळीजवळ झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू तर अन्य एक जण जखमी झाला.

हा अपघात दुचाकी झाडाला धडकल्याने झाला असल्याने सुमीत मारोती कांबळे (वय-20) आणि विश्वजित कालिदास गायकवाड (वय-20) हे दोघे जागीच ठार झाले. अमित सुभाष कांबळे (वय-19) हा गंभीर जखमी झाला आहे.

सर्व जण बोंबळी येथील आहेत. जखमीवर वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी देवणी येथे दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत पावलेल्या दोन युवकांवर कुटुंबाचा चरितार्थ चालत असे. जखमी युवकही मजूरच आहे.

 हे वाचलंत का?

Back to top button