पुढारी ऑनलाईन डेस्क :
पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीत भारताने इतिहास रचला आहे. आज गुरुवारी झालेल्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये (50 m Rifle 3P Men's shooting) भारताचा नेमबाज स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) याने ब्रान्झ (कांस्य) पदक जिंकले. त्याच्या या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, " मराठी पाऊल पडते पुढे! " अशी पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय नेमबाज स्वप्निल कुसाळे यांने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कांस्य पदकावर मोहर उमटवली. त्याच्या या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्ट करत म्हटले आहे, "पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील नेमबाजी खेळातील पुरुष ५० मी.रायफल थ्री पोझिशन विभागात स्वप्नील कुसाळे या कोल्हापूरच्या नेमबाजाने कांस्य पदकावर मोहोर उमटवून संपादन केलेल्या उत्तुंग यशामुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. जागतिक क्रीडाविश्वाच्या नकाशावर देशाचे स्थान अधोरेखित करणारा स्वप्नील हा महाराष्ट्राचा सुपुत्र आहे ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. स्वप्नील, तुझे हार्दिक अभिनंदन तसेच नेमबाजी खेळातील भावी कामगिरीकरता मनःपूर्वक शुभेच्छा."