आलास ता. शिरोळ येथेली पूर पट्ट्यातील नदीकाठी वास्तव्यास असणाऱ्या 12 कुटुंबातील लोकांचे व जनावरांचे स्वतःहून स्थलांतर करण्यात आले. यापैकी सर्वजण कुटुंबातील लोकांनी मित्र परिवार,पै पाहुणे तसेच अन्य ठिकाणी असलेल्या स्वतःच्या घरात राहिले आहेत. सांगितले. असल्याचे तलाठी शिवप्रसाद चौगुले यांनी सांगितले. पाणी पातळी हळुवार वाढत असल्याने अजुन काही कुटुंबे स्थलांतरीत होण्याची शक्यता आहे.
कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातून (Almatti Dam) आज शनिवारी (दि. २७ जुलै) दुपारी १२ वाजता ३ लाख क्युसेक इतका विसर्ग सुरु होता. अलमट्टी धरण येथून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, गेल्या ३ तासांपासून धरणातून सुरासरी ३ लाख क्युसेक विसर्ग सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती, अतिवृष्टी, मदत व बचाव कार्याची माहिती घेऊन आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचावकार्यासाठी आवश्यकता भासल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात, प्रसंगी सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचनाही दिल्या.
पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने शिरोळ तालुक्यातील आलास - मंगावती - जुगुळ मार्गावर पुराचे पाणी आल्याने कर्नाटकला जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान पाण्याच्या पातळीत वाढ सुरू असून आलास परिसरातील अनेक ग्रामस्थ स्थलांतरित होत आहेत.
गेल्या आठ ते दहा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरण क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आज शनिवारी सकाळी कर्नाटक राज्याला जोडणारा आलास - मंगावती जुगळ मार्ग पाण्याखाली गेला आहे.