रविवारी (दि.२८ जुलै) पहाटेपर्यंत ४७.८ इंच इतकी होती. सकाळी ६ वाजता १ इंचांनी पाणी पातळी कमी झाली. तर दुपारी १२ वाजेपर्यंत आणखी ४ इंचानी पाणी पातळीत घट झाली असून, दुपारी १२ वाजता ४७ फूट ४ इंच इतकी स्थिर झाली आहे. मागील सात दिवसांपासून सातत्याने पंचगंगेच्या पातळीत वाढ होत आहे. मात्र आज प्रथमच पंचगंगेच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ तावडे हॉटेल चौकात पुलाखाली साधारणतः चार फूट पाणी असल्याने आज (रविवार) सकाळी गांधीनगर पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ता बंद केला होता. मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने व पाणी थोडे खाली आल्याने सकाळी ११ वाजता दुचाकी वगळता चारचाकी वाहने व अवजड वाहनांना एकेरी वाहतूक कोल्हापूरच्या दिशेने सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता तावडे हॉटेल येथून चारचाकी व अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू झालेली आहे.