Ladki Bahin Scheme| अॅपवरून आधारद्वारे करा अर्ज

प्रशासनाचे आवाहन; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम थेट खात्यावर होणार जमा
Majhi Ladki Baheen' scheme
'माझी लाडकी बहीण' योजनाPudhari File Photo

पुणे : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने' साठी ऑनलाइन अर्ज करताना महिलांना अडचणी येत आहेत. तर 'नारीशक्तिदूत' अॅपद्वारे अर्ज भरताना संबंधित महिलेचे नाव, जन्म दिनांक, संपूर्ण पत्ता आदी माहिती 'आधार कार्ड' नुसारच भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Majhi Ladki Baheen' scheme
बेळगावातील घोटाळ्याच्या सूत्रधाराला अटक

आधार कार्डवरील नावानुसारच अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी संबंधित लाभार्थी महिलेला दीड हजार रुपयांची रक्कम थेट 'डीबीटी' द्वारे खात्यावर जमा होणार आहे.

त्यामुळे त्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने हे परिपत्रक जारी केले आहे. 'नारीशक्तिदूत' अॅपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधार कार्डवर जे नाव लिहिले आहे तेच नाव अर्जात लिहावे.

आधार कार्डवरील नावाप्रमाणे बँकेच्या खात्यावरही तेच नाव असल्याची खातरजमा करावी. आधार क्रमांक बँकेशी संलग्न असल्याची खात्री करून तशी माहिती अॅपमध्ये भरावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

आधार कार्डवरील जन्म दिनांक नारीशक्तिदूत अॅपमध्ये नोंदविण्यात यावा. तसेच, आधार कार्डवर जन्मदिनांक नसल्यास जन्म दाखल्यावरून जन्मदिनांक घेण्यात यावा. आधार कार्डनुसार, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि अन्य माहिती तंतोतत भरावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहन भत्ता

गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, नागरी, सेतू केंद्रातील प्रतिनिधी, समुदाय संसाधन व्यक्ती यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन अर्ज पूर्ण भरण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, नागरी, सेतू केंद्रातील प्रतिनिधी, समुदाय संसाधन व्यक्ती यांना प्रतिअर्ज ५० रुपयांप्रमाणे प्रोत्साहन भत्ता सरकारतर्फे देण्यात येणार आहे, असे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. बी. गिरासे यांनी सांगितले.

Majhi Ladki Baheen' scheme
Monsoon Update| आज-उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्याला 'रेड अलर्ट'

लाडक्या बहिणी'साठी पालिकेची १६३ केंद्रे

राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांचे अर्ज भरण्यासाठी महापालिकेच्या वतीने १६३ वॉर्डमध्ये मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. राज्य शासनाच्या वतीने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना राबविण्यात येत आहे. अडीच लाख रुपयांपर्यंत कुटुंबाचे उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेंतर्गत दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांचे अर्ज भरण्यासाठी महापालिकेच्या वतीने १६३ वॉर्डमध्ये मदतकेंद्र सुरू केले आहेत. कार्यालयीन वेळेत प्रत्येक केंद्रावर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी एक सेवक आणि एका मदतनिसाची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news