सीमाप्रश्नी बैठकीत पालकमंत्र्यांचा प्रवेश

दीपक केसरकर
दीपक केसरकर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याच्या नियोजनाबाबत शनिवारी शासकीय विश्रामगृहामध्ये सुरू असलेल्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रवेश केला.

दरम्यान, आमची बैठक थांबविण्यासाठी त्यांनी प्रवेश केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. यावेळी केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर बैठकीचे स्थळ बदलून पदाधिकार्‍यांनी पुन्हा बैठक घेतली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या प्रवेशामुळे आश्चर्य वाटले. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पोवार उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news