सावधान..! पबजी करेल तुमच्या माईंडचाच ‘गेम’

सावधान..! पबजी करेल तुमच्या माईंडचाच ‘गेम’
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पबजी, ब्लुव्हेल, पोकिमॉनसारख्या असंख्य गेम्सच्या विळख्यात तरुणाई अडकत चालली आहे. पबजी गेममुळे तर आत्महत्या, खून यासह सायकोसिस अ‍ॅटॅक आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पबजीच्या नादात अल्पवयीन मुलाने चक्क आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना ताजी आहे. या हिंसक मोबाईल गेम्सच्या अतिरेकामुळे मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले. यामुळे मोबाईल गेम असणारा पबजी तुमच्या माईंडचा 'गेम' कधी करेल हे समजणारही नाही. परिणामी, पबजी खेळणार्‍यांनी वेळीच सावध होणे गरजेचे असल्याचा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.

मोबाईल दिला नाही की, मुले प्रचंड चिडतात. मोबाईसाठी आरडाओरडीपासून सुरू झालेले प्रकरण घरातल्या वस्तू फेकण्यापर्यंत येते. मानसोपचारतज्ज्ञांकडे पालकांनी केलेल्या या तक्रारींवरून मुलांना लागलेले मोबाईलचे आणि गेम्स वेड लक्षात येते. पबजी असो किंवा कोणताही गेम असो, अतिप्रमाणात खेळल्यास त्याचे व्यसन लागतेच. स्क्रीन अ‍ॅडिक्शनमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन सायकोसिसचा धोकादेखील उद्भवू शकतो.

अशा गेम्स खेळल्याने मुलांचा स्वभाव आक्रम होत आहे. गेम खेळू न दिल्यास पालक आणि मुलांच्या नात्याला ठेच पोहोचत आहे. पबजी या गेमचा एक राऊंड 40 ते 50 मिनिटांचा असतो. एकदा मारले गेल्यानंंतर पुन्हा गेम खेळण्याचा मोह होतो आणि पुन्हा गेम सुरू होते. हे असेच तासन्तास सुरू राहते आणि मोबाईलवरील गेम मुलांच्या माईंडसोबत खेळायला सुरू करतो.

काय आहे पबजी?

पबजीला भारतात बंदी घातल्यानंतर बीजीएमआय हा नवीन गेम सुरू झाला आहे. या गेममध्ये 100 खेळाडूंना एका विमानातून एका बेटावर सोडले जाते. यानंतर सुरू होतो खरा खेळ. धावत-पळत जाऊन अत्याधुनिक हत्यारे गोळा करायची आणि आपला बचाव करत सामोर येईल त्याला मारत जायचे आणि जिंकायचे.

गेम्सच्या व्यसनामुळे मुले एकाकी पडतात. गेममध्ये जिंकले नाही की, त्यांची चिडचिड सुरू होण्यास सुरुवात होते. यामुळे स्वभावात बदल दिसू लागतात. असेच सतत चालू राहिल्यास गंभीर मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे पालकांनी आपली मुले कितीवेळ मोबाईलवर घालवतात, याकडे लक्ष द्यावे.
– डॉ. व्यंकटेश पोवार,
मानसोपचारतज्ज्ञ, सीपीआर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news