संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा : महाराष्ट्राची विजयी हॅट्ट्रिक

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा :  महाराष्ट्राची विजयी हॅट्ट्रिक
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आयोजित 76 व्या हिरो नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप फॉर संतोष ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने आपली घोडदौड कायम राखत सलग तिसरा सामना जिंकला. बुधवारच्या तिसर्‍या लढतीत महाराष्ट्रने दमण-दादरा संघाचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. दरम्यान, हरियाणा व पश्चिम बंगाल संघांचीही घोडदौड कायम असून प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून आगेकूच केली.

संतोष ट्रॉफी स्पर्धेतील ग्रुप-4 चे सामने कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत. फुटबॉलप्रेमींच्या उत्साही उपस्थितीने सामन्यांची रंगत अधिकच वाढली आहे.

ओंकार पाटील ठरला सामनावीर

महाराष्ट्र संघाने दमण-दादरा संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. सामन्यात दोन गोल नोंदविणारा कोल्हापूरचा खेळाडू ओंकार पाटीलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. सामन्याच्या 8 व्या व 10 व्या मिनिटाला ओंकार पाटीलने हे दोन गोल केले. याशिवाय 35 व्या मिनिटाला कौस्तुभ रवींद्रने तिसरा गोल नोंदवून मध्यंतरापर्यंत 3-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात 79 व्या मिनिटाला ऋषीकेश मेथे-पाटीलने गोल नोंदवत संघाची आघाडी 4-0 अशी भक्कम केली.

पश्चिम बंगालचा 5-0 ने विजय

दरम्यान, पश्चिम बंगाल संघाने मध्य प्रदेश संघाचा 5-0 असा धुव्वा उडविला. सामन्याच्या 14 व्या मिनिटाला रोबी हंसदा याने पहिला गोल केला. 22 व 45 व्या मिनिटाला नरहरी श्रेष्ठ याने लागोपाठ दोन गोल करत मध्यंतरापर्यंत 3-0 अशी भक्कम आघाडी मिळविली. उत्तरार्धात 55 व्या मिनिटाला टोटण दासने, तर रोबी हंसदा याने 63 व्या मिनिटाला गोल नोंदवत आघाडी 5-0 अशी अधिक भक्कम केली. यापैकी एकाही गोलची परतफेड मध्य प्रदेशकडून होऊ शकली नाही.

हरियाणाची छत्तीसगडवर मात

हरियाण संघाने छत्तीसगड संघाचा 2-1 असा पराभव केला. सामन्याच्या पूर्वार्धात छत्तीसगडच्या अभयकुमार यादवने 54 व्या मिनिटाला गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात हरियाणच्या हितेन कडियन याने 82 व्या मिनिटाला गोलची परतफेड करून सामना 1-1 असा बरोबरीत केला. यानंतर 84 व्या मिनिटाला प्रदीप कुमारने दुसरा गोल नोंदवत संघाला 2-1 असा विजय मिळवून दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news