शासकीय कार्यालयांत आता चहाऐवजी नाचणीची आंबिल

शासकीय कार्यालयांत आता चहाऐवजी नाचणीची आंबिल
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शासकीय कार्यालयांत येणार्‍या अभ्यागतांना चहा आणि कॉफीऐवजी नाचणीची आंबिल दिली जाणार आहे. यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानिमित्त जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम आयोजित केला.

दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक तृणधान्यांचा वापर वाढावा याकरिता वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालयांत येणार्‍यांना आता नाचणीची आंबिल दिली जाईल. पुष्पगुच्छऐवजी नाचणीपासून तयार केलेले पदार्थ भेट म्हणून दिले जाणार आहेत. कृषी कार्यालयाच्या आवारात आठवड्यातून ठरावीक दिवशी महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.

हॉटेलमध्येही मिलिटरी मेनू कार्ड नुसार किमान एक पदार्थ ठेवावा, तसेच तृणधान्य विषयी माहिती देणारा फलक लावावा, असे आवाहन हॉटेल मालक संघाने केली आहे. शासकीय सभा, कार्यक्रमांच्या जेवणात, तसेच सर्व दवाखाने, वैद्यकीय कॉलेज यांना पुरवल्या जाणार्‍या जेवणात दररोज एका तृणधान्याचा समावेश केला जाणार आहे.

आधारभूत किमतीने 6 हजार क्विंटल नाचणी खरेदी

जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून आधारभूत किमतीने नाचणीची खरेदी केली जाते. गतवर्षी 334 शेतकर्‍यांकडून 2 हजार 531 क्विंटल नाचणीची खरेदी झाली. त्याला 3 हजार 377 प्रतिक्विंटल असा दर मिळाला. यावर्षी 6 हजार 156 क्विंटल नाचणीची खरेदी झाली. त्याला प्रतिक्विंटल 3 हजार 578 असा दर मिळाला.

यावर्षी अठरा हजार हेक्टरमध्ये नाचणी

जिल्ह्यात नाचणीचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या वर्षी 17 हजार क्षेत्रावर नाचणी होती. यावर्षी नाचणीचे क्षेत्र 18 हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news