राजर्षी शाहूंचे कृतिशील कार्य प्रेरणादायी : सतेज पाटील

राजर्षी शाहूंचे कृतिशील कार्य प्रेरणादायी : सतेज पाटील
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी लोकल्याणासाठी केलेले कृतिशील कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या 'राजर्षी शाहू छत्रपतीं'चे निवडक आदेश व 'मोडी पत्रांचे विविध प्रकार' या ग्रंथांतून त्यांचे समतेचे विचार लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्‍वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्‍त केला.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंती निमित्त येथील महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य, पुराभिलेख संचालनालय व कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाच्या वतीने शाहूकालीन दुर्मीळ कागदपत्रे व छायाचित्रांचे प्रदर्शन आणि पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन शाहू स्मारक येथे करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सतेज पाटील व शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मनपा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजिकुमार उगले, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत, डॉ. आनंद पाटील आदी उपस्थित होते. पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विक्रम रेपे यांनी तर आभार प्रदर्शन सहायक संचालक दीपाली पाटील यांनी केले. संयोजन अधीक्षक महेश पाटील, अभिलेखाधिकारी गणेशकुमार खोडके, उपसंचालक सायली पिंपळे व सहकार्‍यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news