

कोल्हापूर : कोल्हापूरमधून पुण्यात शिक्षण, नोकरीनिमित्त स्थलांतरित होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यामुळे या स्थलांतरितांना पुण्यात सामावून घेणे हे इथल्या विकसकांसाठी मोठे आव्हान आहे. हीच बाब हेरत, दै.'पुढारी'ने घर खरेदीदार आणि विकसक यांच्यातील सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला आहे.
येत्या 26 मार्च आणि 27 मार्च रोजी दै. 'पुढारी' पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2022 चे आयोजन कोल्हापूर येथील द पॅव्हेलियन हॉटेल, मधुसूदन हॉल येथे करण्यात आले आहे. आयकॉन स्टील हे या प्रॉपर्टी शोचे प्रमुख प्रायोजक आहेत. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा कोल्हापूरकरांसाठी घर खरेदीची संधी देणारा ठरणार आहे. कारण पुण्यातील अनेक नामांकित महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे.
स्वमालकीचे घर पुण्यात असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
पुण्यातील नैसर्गिक सौंदर्यासोबतच इथले जीवनमान खुणावते. शिक्षणाचे माहेरघर, आयटी तसेच इतर उद्योग क्षेत्रासाठी पुणे ही पंढरी आहे. देशातील स्मार्टसिटीच्या यादीत पुण्याने आपले स्थान अबाधित राखले आहे. त्यामुळे गेल्या दशकभराच्या कालावधीत पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राची वाढ झपाट्याने होत आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने विकसक आता नव्या दमाने प्रकल्प उभारणीसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळेच कोल्हापूरकरांना पुण्यात घर खरेदी करण्याची दै. 'पुढारी' पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2022 ही नामी संधी ठरणार आहे. दुसरीकडे बँकांनी व्याजदरात केलेली कपात, मुद्रांक शुल्क सवलत आणि विक्री वाढवण्यासाठी विकसकही अनेक नवनवीन ऑफर्स ग्राहकांना देत आहेत.
दै.'पुढारी'च्या या पुणे प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये बजेट होम्ससह अनेक लक्झरी प्रकल्पांचाही समावेश आहे. अत्याधुनिक आणि लक्झरियस जीवनप्रणालीचे दर्शन घडवणारे गृहप्रकल्पही या प्रदर्शनातील जमेची बाजू आहे. फर्स्ट होम्ससह सेकंड होम्ससाठीही विविध पर्याय यात खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना पुण्यात घर खरेदीची अपेक्षापूर्ती करणारे हे प्रदर्शन ठरणार आहे, हे निश्चितच !
स्थळ : हॉटेल पॅव्हेलियन, मधुसूदन हॉल, बसंत-बहार रोड, न्यू शाहूपुरी
वेळ : सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत
अधिक माहितीसाठी संपर्क : 9822309352