बाळूमामा देवस्थान ट्रस्ट कार्याध्यक्षपदी पुंडलिक होसमणी

बाळूमामा देवस्थान ट्रस्ट कार्याध्यक्षपदी पुंडलिक होसमणी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान ट्रर्स्टया कार्याध्यक्षपदी पुंडलिक हणमाप्पा होसमणी यांची निवड करण्यात आली. ट्रस्टींच्या बैठकीत ही निवड झाली. 12 पैकी 10 ट्रस्टी या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती सरपंच विजय गुरव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कार्याध्यक्षपदासाठी रितसर सचिवांनी नोटीस पाठवून या बैठकीचे आयोजन केले होते, असे सांगून विजय गुरव म्हणाले, सोमवारी वकिलांचा सल्ला घेण्यासाठी आम्ही आलो असता आमच्यातील ट्रस्टींंना पळवून नेण्याचा डाव होता. त्यांतूनच आमच्यावर हल्ला चढविला होता. सर्व निवडी या कायदेशीर व्हाव्यात व सर्वांना विश्वासात घेऊन कराव्यात असा आमचा प्रयत्न सुरू होता. त्यानुसार आजच्या बैठकीला 12 पैकी 10 विश्वस्त उपस्थित होते. मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले व पोलिसपाटील माधुरी पाटील वगळता सर्व ट्रस्टी बैठकीला उपस्थित होते. कार्याध्यक्षपदी पुंडलिक होसमणी यांची निवड करावी, असा प्रस्ताव आला. या प्रस्तावास बैठकीत उपस्थित सर्व ट्रस्टींनी एकमताने मान्यता दिली. होसमणी हे कर्नाटकातील आहेत. त्यांच्या घराण्याचा बाळूमांमाशी थेट संपर्क होता. आजदेखील देवस्थानची बकरी त्यांच्या शेतात चरण्यासाठी असतात. त्यांच्या घराण्याचे नेहमी बाळूमांमाशी चांगले नाते होते. त्यामुळेच त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे, असेही गुरव यांनी सांगितले.

या बैठकीस राऊसाहेब कोलकरी, शामराव होडगे, शिवाजी मोरे, गोविंद दत्तू पाटील, भिखाजी शिनगारे, तमन्ना मासरेडी, रामान्ना मरेगुत्ती, विजय गुरव, आप्पासाहेब दळवी, पुंडलिक होसमणी आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news