‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव स्मृतिदिनी आज स्मृतिज्योत रॅली

‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव स्मृतिदिनी आज स्मृतिज्योत रॅली

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'पुढारी'चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृती दिनानिमित्त शनिवारी (दि.20) स्मृतिज्योत रॅलीचे आयोजन केले आहे. अ‍ॅमॅच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशन व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग स्कूल, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ही प्रबोधनात्मक रॅली काढण्यात येणार आहे.

नागाळा पार्क येथील इंदिरा निवास येथून सकाळी साडेआठ वाजता या रॅलीला प्रारंभ होणार आहे. दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, समूह संपादक व दै.'पुढारी'चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते स्मृतिज्योतीचे पूजन होईल. त्यानंतर रॅलीला प्रारंभ होणार आहे.

ही रॅली जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जयंती नाला, शहाजी कॉलेजमार्गे दसरा चौकात येईल. तेथून ही रॅली बिंदू चौक, शिवाजी पुतळा, भाऊसिंगजी रोडवरून 'पुढारी' भवन येथे येईल. येथे आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे.

रॅलीत स्केटिंगपटू विविध फलक घेऊन सहभागी होणार आहेत. त्याद्वारे विविध विषयांवर प्रबोधनही केले जाणार आहे. या रॅलीत खेळाडूंसह पालकही सहभागी होणार आहेत.

डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रमांचेही आयोजन केले आहे. 'पुढारी' भवन येथे सकाळी दहा वाजता अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून यावेळी डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news