‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ची दिमाखात सुरुवात

‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ची दिमाखात सुरुवात
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर आणि आजुबाजूच्या जिल्ह्यातील ग्राहकांना घरांचे आणि कमर्शियल प्रॉपर्टीचे भरपूर पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणार्‍या 'पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो'ला शनिवारी दिमाखात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते या भव्य एक्स्पोचे उद्घाटन झाले.

शहर आणि जिल्ह्यातील गृह प्रकल्पांचे स्टॉल्स या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. कोल्हापूरकरांना ही चांगली संधी असून 'पुढारी'च्या या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रेखावार यांनी यावेळी केले. क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर हे अध्यक्षस्थानी होते, तर चेतन वसा हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. उद्घाटनप्रसंगी दैनिक 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर, क्रिडाईचे के. पी. खोत, गौतम परमार, आदित्य बेडेकर हे यावेळी उपस्थित होते.

कोल्हापुरातले सर्व प्रमुख बांधकाम व्यावसायिक सहभागी असलेल्या या एक्स्पोला पहिल्या दिवसापासूनच ग्राहक गर्दी करत आहेत. आयकॉन स्टील हे 'पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2023'चे मुख्य प्रायोजक असून आयकॉन स्टीलचे वितरक श्रीकांत स्टील कागलचे शशिकांत पाटील, किसान हार्डवेअर हातकणंगलेचे नुरमहम्मद शेख, मंगळवार पेठेतील महेंद्र इस्पातचे धीरज ओसवाल हे यावेळी उपस्थित होते.
घर खरेदीसाठी उत्सुक ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर शोधण्याची सुवर्णसंधी घेऊन हा एक्स्पो सुरू झाला आहे. हे प्रदर्शन पुढचे दोन दिवस म्हणजे रविवार, 20 मार्च आणि सोमवार, 21 मार्च असे चालणार आहे.

कोल्हापूर आणि परिसरात निवासी तसेच व्यापारी (कमर्शियल) प्रॉपर्टींचे प्रवर्तक, बांधकाम व्यावसायिक, विकासक, तसेच गृह कर्ज पुरवठादार बँका आणि इतर वित्तीय संस्था तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित पुरवठादार यांचे स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
'पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2023' मध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातील, ग्राहकांच्या गरजानुरुप निवासी आणि व्यापारी प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. बांधकाम व्यावसायिक, विकासक, प्रवर्तक आणि खरेदीदारांच्या गरजांचा विचार करुन या एक्स्पोची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळेच आपला ब—ँड ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची तसेच व्यवसायवृद्धीची संधी म्हणून 'पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो'ला बांधकाम क्षेत्रातून पसंती दिली जात आहे.

'चैत्रपालवी'चे मोफत पासेस एक्स्पोच्या ठिकाणी

दैनिक 'पुढारी'च्या वतीने आयोजित 'चैत्रपालवी' या सूर-तालाच्या संगीतमय मैफलीचे मोफत पासेस एक्स्पोच्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. 'लिटल चॅम्प' विजेती अंजली गायकवाड आणि 'संगीत सम—ाट सीझन-2'ची विजेती नंदिनी गायकवाड या जीवनगाने वाद्यवृंदासोबत ही शब्दसुरांची मैफिल सादर करतील. मंगळवार, दि. 21 रोजी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

आयकॉन स्टील हे एक गुणवत्तापूर्ण स्टील असल्याने बांधकाम क्षेत्रात त्याला पसंती दिली जात आहे. ग्राहकांना त्यांच्या पैशाचा पूर्णपणे मोबदला देण्याबरोबरच, वास्तूच्या टीकाऊपणाचे समाधान हे आमचे वैशिष्ट्य आहे.
– त्रिलोक देवासी, करवीर ट्रेडर्स आयकॉन स्टील वितरक

आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले आयकॉन स्टील, हे मजबूती आणि लवचिकतेच्या बाबतीत अव्वल दर्जाचे असल्यामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्टीलमध्ये गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही.
– भरत जयकुमार पटेल, जे. के. स्टील, इचलकरंजी

प्रदर्शन दिनांक : 19, 20 मार्च
वेळ : सकाळी 10 ते रात्री 8
स्थळ : मधुसुदन हॉल, असेंब्ली रोड, शाहूपुरी, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news