परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी सुवर्णसंधी

परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी सुवर्णसंधी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य, देशात वैद्यकीय शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांची संख्याही तुलनेने लक्षणीय आहे. अलीकडील काही वर्षांत परदेशातील शिक्षणाचे ध्येय बाळगणार्‍या विद्यार्थी संख्येतही वाढ होत असताना त्यांनाही मुबलक पर्याय, संधी उपलब्ध आहेत. मंगळवार, दि. 27 रोजी सायंकाळी 5.30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे परदेशातील वैद्यकीय शिक्षण संधी आणि प्रवेश प्रक्रिया याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या हेतूने दै. 'पुढारी' आणि फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेसचे संस्थापक डॉ. अमित बोराडे विद्यार्थ्यांना परदेशातील वैद्यकीय शिक्षण संधी आणि प्रवेश प्रक्रिया यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेले डॉक्टरही विद्यार्थ्यांसोबत स्वानुभव सांगणार आहेत.

वैद्यकीय शिक्षणासाठी अभ्यासातील मेहनतीसह शिक्षण घेत असलेले कॉलेजही महत्त्वाचे आहे. अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन अद्ययावत तंत्रज्ञानातील वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असते; मात्र माहितीच्या अभावामुळे किंवा काही गैरसमजांमुळे विद्यार्थी या संधीपासून माघार घेतात; पण योग्य मार्गदर्शन, माहिती असेल, तर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल. या अनुषंगाने या कार्यक्रमात परदेशातील वैद्यकीय शिक्षणाबाबत असलेले समज, गैरसमज, करिअर, संधी, सुरक्षितता, हॉस्टेल, मेस, परदेशातील अभ्यास पद्धती, फीबाबतची रचना आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

माफक शुल्कात शिक्षण

अनेकांना परदेशातील शिक्षण महाग वाटते. प्रत्यक्षात परदेशातील वैद्यकीय विद्यापीठांतील शिक्षण भारतातील एमबीबीएसच्या तुलनेत माफक दरात असल्याचे जाणकार सांगतात. अनेक महाविद्यालयांत सुलभ हप्त्यांच्या शैक्षणिक कर्जाचीही सोय उपलब्ध असल्याने मध्यमवर्गीय मुलांचेही डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अनेक देशांत वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत.

परदेशात शिक्षण अन् स्वदेशी रुग्णसेवेची संधी

विविध विद्यापीठांच्या योजनांतून शिष्यवृत्ती मिळत असल्याने आर्थिक बोजा कमी होतो. दरवर्षी परदेशात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असून प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या त्यामध्ये सर्वाधिक आहे. देशात वैद्यकीय महाविद्यालये तुलनेने कमी असल्याने डॉक्टर होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाचे दालन खुले आहे. अधिक माहितीसाठी 9834433274, 9404077990 या क्रमांकांवर संपर्क करा. कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश असून याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या विषयांवर माहिती

  • पुढील परीक्षेबाबत विशेष मार्गदर्शन
  • परदेशातील महाराष्ट्रीयन वसतिगृह आणि जेवणाची सोय
  • भारतीय वैद्यकीय अभ्यासक्रम
  • परदेशातील विविध विद्यापीठांत शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची भेट
  • परदेशातील विद्यापीठांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद

विषय : परदेशातील वैद्यकीय शिक्षण संधी व प्रवेश प्रक्रिया
मार्गदर्शक : डॉ. अमित बोराडे, संस्थापक, फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस
स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, वेळ : सायंकाळी : 5.30 वाजता
प्रवेश : पालक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news