तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी पुढे यावे : जिल्हाधिकारी

तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी पुढे यावे : जिल्हाधिकारी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : तृतीयपंथी व्यक्‍तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शासकीय योजनांच्या लाभासाठी त्यांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन करत त्याकरिता प्रत्येक विभाग सहकार्य करेल, असेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्‍त समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वअंतर्गत शिवाजी विद्यापीठात तृतीयपंथी सर्वसमावेशक एक दिवसीय कार्यशाळा झाली. तृतीयपंथी गौरी पोवार यांना जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते कंत्राटी तत्त्वावरील नोकरीचे नियुक्‍तीपत्र देण्यात आले.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, सन्मानाने जगायचे असेल तर आत्मविश्वास बाळगा. स्वत:मध्ये बदल करा. कष्ट करून आत्मसन्मानाने व स्वाभिमानाने जगा.

सहायक आयुक्‍त विशाल लोंढे, तृतीयपंथीयाच्या हक्‍कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय सदस्य श्रीगौरी सावंत, अ‍ॅड. दिलशाद मुजावर यांनी मनोगत व्यक्‍त केले.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम कुमार पाटील, मयुरीताई आळवेकर, कल्याण मंडळाच्या जिल्हा प्रतिनिधी अमृता सुतार तसेच तृतीयपंथी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news