कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा रविवारी (दि. 9) दुपारी चार वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात नागरी सत्कार व गौरव ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे.
समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विशेष अतिथी म्हणून पंतप्रधानांचे भाषा सल्लागार, ज्येष्ठ लेखक डॉ. दामोदर खडसे असणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. शिर्के अध्यक्षस्थानी असतील.
याप्रसंगी डॉ. लवटे यांचा जीवनपट उलगडणारी सरल्या ऋतूचं वास्तव, मी या काळात नाही (कवितासंग्रह), पुस्तक संहिता – खाली जमीन, वर आकाश – एक विमर्श (समीक्षा) लेखक डॉ. राजेखान शानेदिवाण या निर्मिती प्रकाशनाच्या चार पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. दळवीज आर्टस्च्या विद्यार्थ्यांचे डॉ. लवटे यांच्या भावमुद्रा रेखाचित्र प्रदर्शन मांडण्यात आले आहे. नागरी सत्कारास सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.