डेंग्यू व चिकुनगुनियाचे कोल्हापुरात आठ रुग्ण

डेंग्यू व चिकुनगुनियाचे कोल्हापुरात आठ रुग्ण

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरात बुधवारी डेंग्यू व चिकुनगुनियाचे आठ रुग्ण सापडल्याने महापालिका यंत्रणेत खळबळ उडाली. डेंग्यूचे 4 आणि चिकुनगुनियाच्या 4 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. साळोखेनगर परिसरातील तुळजाभवानी कॉलनी व परिसरातील हे रुग्ण आहेत. डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण सापडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत डेंग्यूसद़ृश आजाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने त्यांच्या रक्ताची तपासणी केली. त्यामध्ये आठ रुग्णांना डेंग्यू व चिकुनगुनिया झाल्याचा अहवाल आला. महापालिकेच्या वतीने परिसरात तत्काळ धूर फवारणी, औषध फवारणी करण्यात आली. तेथे घरोघरी सर्वेक्षण केले जाणार आहे. डेंग्यू आणि चिकुनगुनियासद़ृश लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन मनपाने केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news