जोतिबा चरणी त्यांनी जपलाय सेवाभाव; स्वयंसेवी संस्थांकडून भाविकांची सेवा

जोतिबा चरणी त्यांनी जपलाय सेवाभाव; स्वयंसेवी संस्थांकडून भाविकांची सेवा
Published on
Updated on

कोल्हापूर; गौरव डोंगरे :  दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनाला सर्वच थरातील भाविक येत असतात. देवाच्या दरबारी कोणी लहान – मोठा, श्रीमंत-गरीब असा भेदभाव नाही. भाविकांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी अनेक अदृश्य हात यात्रा काळात सेवा देतात. वाहन पंक्चर झालेली असो, पिण्याचे पाणी, जेवणाची आवश्यकता असा मसेवाभावफ जपणार्‍या अनेक संस्था कित्येक वर्षे सेवा देत आहेत.

भाविकांसाठी अन्नदान सेवा

सहजसेवा ट्रस्टच्यावतीने गायमूखानजीक पायी यात्रेकरुंसाठी 2 ते 6 एप्रिल कालावधीत अन्नछत्र उभारण्यात आले आहे. पंचगंगा नदी घाटावर शिवाजी चौक मंडळाचे अन्नछत्र 4 ते 6 एप्रिल चालेल. जोतिबा डोंगरावर आर. के. मेहता ट्रस्टचे अन्नछत्र 4 ते 6 एप्रिल कालवधीत सुरु राहणार आहे. महालक्ष्मी अन्नछत्राची वेळही 1 तासाने वाढविण्यात आली असून दरारेज 5 ते 6 हजार भाविक भोजन प्रसाद घेवू शकतील.

मोफत दुचाकी दुरुस्ती, पंक्चर सेवा

जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक्स असोसिएशन यांच्यावतीने 4 व 5 एप्रिल रोजी मोफत दुचाकी दुरुस्ती व पंक्चर सेवा दिली जाणार आहे. अंदाजे 50 तास हा उपक्रम सुरु राहिल. यामध्ये 80 ते 100 मेकॅनिक्स व पंक्चर काढणारे 24 तास सेवा देणार आहेत. जोतबा डोंगर घाटात प्रत्येकी 1 किलोमीटर अंतरावर याचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. घाटामध्ये एक फिरते दुरुस्ती पथक कार्यरत राहिल.

तत्पर वैद्यकीय सेवा

भाविकांसाठीस जिल्हा परीषद आरोग्य विभाकडून 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. व्हाईट आर्मीचे एक वातानुकूलित हॉस्पीटल यात्राकाळात असेल याठिकाणी शंभरावर डॉक्टरांचे पथक तैनात राहणार आहे. तसेच रोटरी क्लब, देवस्थान समितीकडूनही वैद्यकीय पथके ठेवण्यात आली आहे. दोन अद्ययावत रुग्णवाहिकाही यात्राकाळात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

मोफत पार्कींग

जोतिबा डोंगर, पायथ्यानजीक पार्कींगच्या जागा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दुचाकी, चारचाकी पार्कींगची ठिकाणे सुरक्षित रहावीत यासाठी रात्रीच्यावेळेस प्रकाश योजना, सीसीटीव्ही व सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत.

चहा, नाश्ता, पाणी

सौराष्ट्र पटेल समाजाच्यावतीने पंचगंगा नदी घाटावर भाविकांना मोफत नाश्ता, चहा, पाणी पुरविले जाईल. 4 ते 6 एप्रिल कालावधीत शिवाजी चौक तरुण मंडळाच्या मंडपामध्येच सकाळी 7 ते 9 यावेळेत याचे वाटप सुरु राहणार आहे. पाटीदार समाज युवक मंडळातर्फे गायमूखनजीक सरबत व पाणी वाटप करण्यात येणार आहे. यात्रा काळात 20 हजार लीटर कोकम सरबताचे वाटप होण्याचा अंदाज आहे.

विनामूल्य बस सेवा

झंवर ग्रुपच्यावतीने पंचगंगा नदी घाट ते जोतिबा डोंगर या मार्गावर विनामूल्य बस सेवा सुरु राहणार आहे. सकाळी 7 ते रात्री 7 यावेळेत या बसेस मार्गावर धावतील. बसमधील प्रवाशांना चिक्की व पाणीही दिले जाईल. तसेच जोतिबा डोंगर पायथ्याच्या पार्कींगपासून डोंगरावर जाण्यासाठी देवस्थान समितीकडून 40 एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. ही सेवा विनामूल्य असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news