जादा साखरेची विक्री केल्याबद्दल 63 कारखान्यांचा कोटा घटवला

जादा साखरेची विक्री केल्याबद्दल 63 कारखान्यांचा कोटा घटवला

[author title="डी. बी. चव्हाण" image="http://"][/author]

कोल्हापूर : जाद दर मिळतो म्हणून व केंद्र सरकारच्या आदेशाशिवाय सरकारने ठरवून दिलेल्या साखर कोट्यापेक्षा जादा साखर विक्री केल्याप्रकरणी देशातील 63 कारखान्यांचा जून महिन्याचा साखर कोटा सरकारने कमी केला आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ही कारवाई केली आहे. याचा फटका कारखान्यांना बसणार आहे.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जून महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी 572 कारखान्यांमध्ये 25.5 लाख टन साखरेचे वाटप करून 30 मे रोजी आदेश काढले आहेत. पण त्यामध्ये देशातील 63 साखर कारखान्यांचा साखर कोटा कमी केला आहे. तसेच यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, काही साखर कारखान्यांनी स्टॉकहोल्डिंग मर्यादेचे उल्लंघन केले आहे. त्या कारखान्यांनी मार्च 2024 च्या रीलिज कोट्यापेक्षा जास्त साखर विकली आहे म्हणून अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 (1955 चा 10) च्या कलम 3 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कलम 4 आणि शुगर (नियंत्रण) आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

जूट पॅकेजिंग मटेरियल (पॅकिंग कमोडिटीजमध्ये सक्तीचा वापर) कायदा, 1987 अंतर्गत 20 टक्के साखर तागाच्या पिशव्यांमध्ये घालून त्याचे पॅकिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंबंधीची माहिती एनएसडब्ल्यूएस पोर्टलवर पी-खख प्रोफॉर्मामध्ये सादर करण्याचे निर्देशही साखर कारखान्यांना देण्यात आले आहेत. जे कारखाने याप्रमाणे साखरेचे पॅकिंग करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत दिले जात आहेत.

महाराष्ट्रातील 20 कारखाने

कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये महाराष्ट्रातील 20 साखर कारखान्यांचा समावेश आहे. कर्नाटकातील 6, उत्तर प्रदेश 27, तामिळनाडू 8, पंजाब, 2 अशा 63 कारखान्यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news