छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणार्‍या आमदार मावळ्यांचे जाहीर आभार

छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणार्‍या आमदार मावळ्यांचे जाहीर आभार
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिवरायांचा गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणार्‍या सर्व आमदार मावळ्यांचे जाहीर आभार, असा फलक संभाजीराजे समर्थकांनी मुंबईत शिवसेना भवनासमोर झळकावून शिवसेनेला डिवचले आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यातील संबंध बिनसले आहेत. शिवबंधन बांधण्याचे नाकारून संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आपली वाटचाल सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे. संभाजीराजे यांनी राज्यसभा निकालानंतर ट्विट करून शिवसेनेला डिवचले होते. आता त्यांच्या समर्थकांनी मुंबईत शिवसेना भवनासमोर त्याचबरोबर कोपरखैरने येथे फलक लावून आपल्या मनातील व्यथेला वाट मोकळी करून दिली आहे. या फलकाची सर्वत्र चर्चा होती. फलक मुंबईत लावला असला, तरी चर्चा कोल्हापुरात रंगली होती.

महाराष्ट्र आमच्या बापाचा, छत्रपती शिवरायांचा

'आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय, महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे, छत्रपती शिवरायांचा' असाही उल्लेख फलकावर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 'राज्यसभा तो झाँकी है। स्वराज्य में 2024 अभी बाकी है।' असे म्हणत 'जय शिवराय' असा उल्लेख फलकावर आहे. छत्रपती शिवरायांची प्रतिमा आणि संभाजीराजे यांचा फोटोही या फलकावर असून त्याखाली 'स्वराज्य' असे लिहिण्यात आले आहे.

समर्थकांनी माझ्या प्रेमापोटी जे फ्लेक्स लावले त्यांच्या प्रेमाचा मी आदर करतो; मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे हे आपल्या तत्त्वात बसत नाही. राजकारणात येणार असलो, तरी 'स्वराज्य'ला तत्त्वांची बैठक असेल.
– संभाजीराजे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news