छ.शिवरायांचा पुतळा प्रेरणादायी ठरेल : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर

छ.शिवरायांचा पुतळा प्रेरणादायी ठरेल : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर
Published on
Updated on

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व त्यांच्या देदीप्यमान इतिहासाचे दर्शन घडवणारे म्युझियम येत्या सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल. या संपूर्ण कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व म्युझियम प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

जयसिंगपूर येथील नगरपरिषदेच्या वतीने 2 कोटी 19 लाख रुपये खर्चातून गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व म्युझियमच्या कामाची पाया खोदाई मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते.

आ. यड्रावकर म्हणाले, होणारे काम वेगाने उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम पूर्ण करावे. गेल्या 50 वर्षांपासूनची मागणी सध्या सत्यात साकारत असताना अभिमान वाटत आहे. त्यामुळे शहरवासीयांनी पाहिलेले स्वप्न लवकरच साकारेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी अर्जुन देशमुख व माजी नगरसेविका रेखा देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्षा डॉ.नीता माने, माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मिलिंद शिंदे, माजी नगरसेवक शीतल गतारे, प्रेमला मुरगुंडे, राजू आडके, यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. आभार मुख्याधिकारी तैमूर मुलांनी यांनी मानले. स्वागत व सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पायाभरणी

गेल्या 50 वर्षांपासून शहरातील अश्वारूढ पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर बुधवारी पायाखोदाई करण्यात आली व पाया खोदाईचे काम पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पायाभरणी करणार असल्याची माहिती राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news