चिकन दर बेलगाम! म्हणे विदाऊट स्कीनमुळे दरात फरक

चिकन दर बेलगाम! म्हणे विदाऊट स्कीनमुळे दरात फरक
Published on
Updated on

कोल्हापूर ; सागर यादव : महागड्या मटणाला पर्याय म्हणून चिकनला मोठी मागणी आहे; पण चिकनच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने विक्रेते अव्वाच्या सव्वा दर आकारत आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये आपली लूट होत असल्याची भावना वाढीस लागली आहे. मटणाच्या सातत्याने होणार्‍या दरवाढीवर नियंत्रणासाठी लोकांनी आंदोलन केले, तरीही मटणाचे दर वाढलेच. आता चिकन दरही गगनाला भिडत आहेत.

तांबडा- पांढरा रस्सा, सुक्के मटण, भाकरी-भात, कांदा ही रांगड्या कोल्हापूरकरांची फेवरेट डिश आहे. बहुतांश खवय्यांना आठवड्यातून किमान दोन वेळा ही डिश लागतेच. वर्षभरापूर्वी मटणाचा दर वाढला होता. यामुळे खवय्यांना मटण दरावरील नियंत्रणासाठी आंदोलन करावे लागले. शासन, खाटिक संघटना व आंदोलकांच्या चर्चेतून मटणाचा दर 600 ते 650 रुपये प्रतिकिलोवर स्थिरावला आहे.

म्हणे विदाऊट स्कीनमुळे दरात फरक

जिवंत पक्षाचा दर होलसेल बाजारात 150 ते 165 इतका आहे. त्यातून सुमारे 600 ग्रॅम (अर्धा किलोपेक्षा अधिक) अनावश्यक भाग काढून टाकले जातात. याशिवाय चिकनची विक्री जिवंत पक्षी, सरसकट किंवा बोनलेस, विथ स्कीन किंवा विदाऊट स्कीन अशा विविध प्रकारे होते. यामुळे दरात मोठा फरक पडतो. सेवा-सुविधा, नोकर पगार, लाईट-पाणी, दुकान भाडे यावर होणारा खर्च या सर्व गोष्टींचा विचार करून दरात तफावत दिसते. शिवाय व्यापार्‍यांमधील स्पर्धा, व्यावसायिक चढाओढीमुळे काही ठिकाणी ग्राहकांची लूट होताना दिसत आहे. चिकनचा दर 200, 220, 240, 260 आणि 280 रुपये प्रतिकिलो असा ठिकठिकाणी वेगवेगळा पाहायला मिळत आहे.

…म्हणून चिकनला मागणी

मटण सर्वसामान्य-गोरगरिबांच्या अवाक्याबाहेर गेल्याने याला पर्याय म्हणून चिकनला मोठी मागणी आहे. केवळ मटण करणे परवडत नसल्याने घरोघरी मटणाच्या जोडीला चिकनही आणले जाते. सुक्क्यासाठी मटणाचा वापर केला जातो. तांबडा-पांढरा रस्सा बनविण्यासाठी सर्रास चिकनचाच वापर होताना दिसतो. समारंभ, जत्रा-यात्रा, जेवणावळी, पार्टी यामध्येही मटणाच्या बरोबरीने चिकनचा वापर होताना दिसतो. याशिवाय चिकन बिर्याणी, चिकन 65, चिकन नुडल्स व सुप, चिकन सँडविच यासह विविध पदार्थांमध्ये चिकनचा वापर होत असल्याने चिकनला मोठी मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news